वरणगाव फॅक्टरी मध्ये मुख्य बस स्टँड लगत एक मोठे झाड रिक्षावर पडून दोन रिक्षाचे व एक दुचाकीचे नुकसान झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे घटना घडली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी वरणगांव फॅक्टरी मधील मुख्य बस स्टँड जवळ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास काही वादळ वारा नसताना पिवळ्या गुलमोहराचे झाड अचानक मोठ्या बुंध्या व फांद्या सहीत दोन रिक्षावर व मोटार सायकल वर पडले .
त्यात दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे . समाधान शांताराम तायडे रा . सुशिल नगर दर्यापूर याची रिक्षा क्रमांक एम एच १९ व्ही 8424, तर प्रकाश शांताराम चौधरी राहणार फुलगाव याची रिक्षा नंबर एम एच १९ व्ही 7740 तसेच मनोज बोहरे रा . सुशिल नगर यांच्या मालकीची मोटार . सायकल क्र एम एच १९ ए टी १४८१ या तिन्ही वाहनांचे झाडाखाली दबून नुकसान झाले आहे .यात प्रकाश चौधरी हाताला व समाधान तायडे यांच्या पाठीला यांना किरकोळ मार लागला आहे .
याबाबत तलाठी मंगेश पारसे यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे . रिक्षाचे प्रत्येकी 20000 रुपये तर मोटरसायकलचे पाच हजार रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे . यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन सोनवणे व सुधाकर चौधरी यांनी तलाठी व आमदार यांना दूरध्वनीद्वारे सदर घटना कळविली होती . नुकसान झालेली तिघे व्यक्ती गरीब परिवारातील असुन त्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे .अचानक ही घटना घडल्याने फॅक्टरी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .