Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगाव ला अप्पर तहसील कार्यालय करण्याबाबत सहानुभूती पूर्वक फेर विचार करा जिल्हाधिकारी डॉ अमन मित्तल यांच्या कडे भाजपची मागणी**ग्रामविकास मंत्री ना गिरीश भाऊ महाजन यांनी विशेष बाब म्हणून मंजूर करा जिल्हाधिकारी यांना दिल्या सूचना*


 वरणगाव हे ब्रिटिश काळात तालुका होते   मात्र  वरणगाव रद्द करून भुसावळ करण्यात आले 
महसूल ची सारी कामे करण्यासाठी वरणगाव पंचक्रोशीतील 28 खेडे गाव मधील नागरिकांना वीस ते चाळीस किलो मीटरचा फेरा मारून भुसावळ ला जावे लागते व ज्येष्ठ व महिला पुरुषांचे हाल मोठ्या प्रमाणात होत असतात अगदी उत्पन्नाचा दाखला असेल याटेस्टेड  शेतकऱ्यांना विविध दाखल्या बाबत नवीन रेशन  कार्ड काढणे धान्य सुरू करण्यासाठी  विविध निराधार लोकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी  भुसावळ तहसील कार्यालय येथे वीस ते चाळीस की मी च्या फेर्याने यावे जावे लागते  यासाठी महसूल च्या माध्यमातून वरणगाव साठी अप्पर तहसील कार्यालय व्हावे यासाठी तहसील मधून प्रस्ताव मंजुरी साठी पाठविला होता मात्र जिल्हा प्रशासनाने भुसावळ तालुक्यातील फक्त 58 खेडेच असल्याने वरणगाव ला अप्पर तहसील कार्यालय करता येणार नाही म्हणून प्रस्ताव फेटाळून लावला जिल्हाधीकारी  डॉ अमन मित्तल यांची  वरणगाव चे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भेटून घेऊन  वरणगाव ला 28 खेडे लागून आहे त्यात वरणगाव हे पन्नास हजार लोकसंख्या असलेले नगर परिषद असलेले शहर आहे वरणगाव पूर्वी तालुका होता  नागरिकांची महसूल च्या कामे करण्यासाठी वीस ते चाळीस की मी च्या 
 फेऱ्याने  जावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक मानसिक फटका बसत असतो  या बाबत आपण फेटाळलेला प्रास्ताव चां सहानुभुतीपूर्वक फेरविचार करून विशेष बाबा म्हणून  वरणगाव ला अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याबाबत फेरविचार करावा अशी मागणी 
आज जिल्हाधिकारी डॉ अमन मित्तल यांच्या कडे केली या वेळी ग्रामविकास मंत्री ना गिरीश भाऊ महाजन यांना वस्तू स्तीथी बाबत माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मोबाईल वरून दिली व तात्काळ ग्रामविकास मंत्री ना गिरीश भाऊ महाजन यांनी जिल्हाधिकारी डॉ अमन मित्तल यांच्या शी भ्रमणध्वनीवर बोलून विशेष बाबा म्हणून वरणगाव ला अप्पर तहसिल कार्यालय आपल्या स्थरारून मंजूरी साठी प्रस्ताव मंत्रालयात पाठवा अश्या सूचना केल्या यावेळी जिल्हाधिकारी यांनी 16 मे रोजी महसूल च्या अधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ  मीटिंग बोलवली आहे यावेळी  आमदार संजय सावकारे यांना सुध्हा  निवेदन दिले यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या सोबत  भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी जिल्हाचिटनिस गजानन वंजारी अनिल वंजारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.