भुसावळ शहरालगत साकेगाव शिवारात गावठी कट्टा बाळगून एक इसम दहशत निर्माण करीत असल्याचे माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन संशयितास अटक केली आहे . .शाहरुख राजू पटेल वय २६ , रा . साकेगाव , तालुका भुसावळ असे पहिल्या आरोपीचे नाव असून त्यास गावठी कट्टा व काडतुसा सह ताब्यात घेतले आहे .
याबाबत माहिती अशी की भुसावळ परिसरात आरोपी गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली त्यांनी पोहेकॉ सुरज पाटील , रमण सुरळकर , यासीन पिंजारी , संकेत झांबरे यांचे पथक या कामी पाठवले असता साकेगाव मराठी शाळेत पटांगणावर गावठी कट्टा , जिवंत काडतूस , दोन चापर व मोटरसायकल घेऊन राजु पटेल फिरत असल्याचे दिसले . यावेळी या साहित्यासह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गावातील त्याचा मित्र विकास पांडुरंग लोहार वय 30 राहणार श्रीराम नगर साकेगाव यांच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले .विकास यास राहत्या घरातून ताबत घेतले असून तिसरा आरोपी जयसिंग उर्फ सोनू रायसिंग पंडित, वय 26 , रा. वाल्मिक नगर भुसावळ यांच्याकडून हे साहीत्य खरेदी केले असल्याचे कबूल केले असून तीघांना अटक करण्यात आली आहे .
या घटनेत एकूण मोटार सायकल सह एक लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस अधीक्षक एम राजकुमार ' अप्पर पोलीस निरीक्षक चंद्रकांत गवळी , पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोस्टचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे ,अमोल पवार करीत आहेत .