Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात . उल्हास 2 k 23 चे . आयोजन



विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांचा बळावर कोणाच्या आत दडलेल्या प्रतिमेला तसेच *सुप्त गुणांना चालना मिळावी* या हेतूने महाविद्यालयांमध्ये *उल्हास 2K23 (स्नेहसंमेलन)* याचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी दिनांक *3 मे 2023 ते 5 मे 2023* यादरम्यान करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या कल्चरल नाईट च्या उद्घाटनाप्रसंगी *गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर* हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून *श्री. एम राजकुमार (आय.पी.एस. सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस जळगाव),* तसेच श्री *दीपक चौधरी (चेअरमन, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेड)* हे उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत डॉ.केतकी पाटील (सदस्य, गोदावरी फाउंडेशन), डॉ.वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन), प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा. भावना झांबरे (समन्वयक, उल्हास 2K23) सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे उल्हास 2K23 या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी कार्यक्रमाचे *मुख्य आकर्षण म्हणून अहिराणी सुपरस्टार श्री सचिन कुमावत व पुष्पा ठाकूर या उपस्थित राहणार आहेत.* त्यामुळे या कल्चरल नाईट साठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनामध्ये वेगवेगळ्या इव्हेंट्स चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात *दि.3 मे रोजी बॉलीवूड डे, ट्रॅडिशनल डे, रोझ डे, ग्रुप डे, ट्विंस डे* चे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर *दि. 4 मे रोजी हॅलोविन डे तसेच म्युझिकल शेलापागोटे* यांचे आयोजन करण्यात आले आहे. 
शेवटच्या दिवशी *5 मे रोजी कल्चरल नाईट* चे आयोजन करण्यात आले आहे.

या तीन दिवस चालणाऱ्या गॅदरिंग मध्ये विद्यार्थी त्यांचे नृत्याविष्कार, गायन कौशल्य तसेच एकांकिका असे विविध प्रयोग सादर करतील.

या स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. भावना झांबरे या आहेत. त्यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संगणक विभागाचा चेतन शिंदे (जनरल सेक्रेटरी) व यंत्र विभागाचा हेमंत झांबरे (कल्चरल सेक्रेटरी) हे परिश्रम घेत आहेत. त्यांच्यासोबत इतर समित्यांचे प्रमुख व विद्यार्थी हे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.