आपल्या सभोवती वेगवेगळे छंद जोपासणारे व्यक्ती पाहत असतो,असाच वृक्ष लावणे व त्याला जगवणे चा छंद जोपासणारे हे उल्हासभाऊ बिर्हाडे आहेत .
ते वरणगाव फॅक्टरी वसाहतीत राहणारे असुन यांनी छंद जोपासला आहे, ते रोज सकाळी ड्युटी वर जाताना त्यांच्या मोटारसायकल ला पाण्याच्या चार पाच बाटल्या टांगलेल्या दिसतात, विविध ठिकाणी जिथे झाड लावलेले आहे त्या जागेवर जाऊन झाडांना पाणी घालतात. फावल्या वेळी लावलेल्या प्रत्येक झाडा कडे फेर फटका मारतात.
झाडांना सतत पाणी मिळावं म्हणून त्यांनी प्रत्येक झाडावर निकामी झालेली सलाईन बॉटल बांधली आहे . त्यात पाणी घातले कि ते थेंब-थेंब झाडाच्या मुळात झिरपत राहत.असे त्यानी आज पर्यंत पन्नास पेक्षा जास्त ठिकाणी परिसरात लावून ती जगवली आहेत,
जगलेल्या झाडाची व्यवस्थित छाटणी करतात ही करायला स्वतःची कैची आहे, झाडाला गुरेढोर या पासून रक्षण व्हावं म्हणून त्याला काट्याच कुंपण घातलेलं दिसत.
यात मध्ये बहुदा वडाची झाड,आणि लिंबाची झाड आहे.या कामात त्यांना त्यांचा मुलगा,व मित्र संतोष वानखेडे,प्रमोद खाडे ,हर्षल सुतार, कैलास ठाकूर ,दिनेश वानखेडे सोबत सहकार्य करीत असतात . त्यांना ह्या कामात आनंद मिळतो . तसेच त्यांचे म्हणणे आहे कि प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी एक तरी झाड लावले पाहिजे,ते स्वतःच्या घरातील प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी झाडे लावली आहे. आणि ही असंच वृक्षारोपण आपण करीत राहण्याचा त्यांचा मानस आहे.