पिप्री सेकम शिवारातील भारनियमन कायमस्वरूपी बंद करावे यासाठी दिपनगर येथील पंपिंग हाऊस कालव्याजवळ ग्रामस्थां तर्फे व शेतकऱ्यां तर्फे आंदोलन सुरू करण्यात आले आहे . पंपाचे आठ ते दहा तासाचे भारनियमन रद्द करण्यात यावे . यासाठी ग्रामस्थांनी विद्युत मंडळाला अर्ज देऊन सुद्धा त्यांनी रद्द केले नसल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे . सदरचे गाव न हे दिपगरच्या प्रकल्पाच्या पासून बाधित असलेले गाव असून प्रकल्पापासून होणारे प्रदूषण , प्रकल्पातून होणारे राख प्रदूषण प्रकल्पात मधून जाळल्या जाणाऱ्या कोळशामुळे तापमानात ४० ते ४५ . सेटींग्रेड पर्यत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ऊस व इतर पिके यास वेळोवेळी पाणी द्यावे लागते .
या ठिकाणी भारनियमन केल्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले असून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते . या कारणाने सदर आंदोलन करण्यात आले असून त्वरित भारनियमन रद्द करावे अशी मागणी केली आहे .
दरम्यान आंदोलना ठिकाणी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भेट दिली असून सावकारे यांनी पंधरा दिवसांसाठी भारनियमन रद्द करण्याचे सांगितले . परंतु आंदोलकांचे समाधान झाले नसल्याने हे आंदोलन सुरूच राहिले असून प्रशासनाने सदर मागणी पूर्ण नाही केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले .यावेळी संघर्ष समितीचे रमाकांत चौधरी व इतर उपस्थित होते मागणीच्या प्रती लोक संघर्ष नेत्या प्रतिभा शिंदे , अभियंता दिपनगर , तालुका पोलीस स्टेशन यांना पाठविण्यात आल्या आहेत .