भुसावळ येथील साकरी उड्डाणपुलाजवळ १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे .
घटना घडल्या नंतर वरणगाव पोलीस स्टेशन व भुसावळ तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा . जळगाव यांचे पथक तयार करण्यात आले होते .सदर पथक सुसरी आचेगाव ,तळवेल भानखेडा या गावात आरोपीचा शोध घेत होते . वरणगाव पोलीस स्टेशनचे स पो.नि आशिश अडसूळ , पो उ नि . परशुराम दळवी, प्रशांत ठाकूर ' , भूषण माळी व उपविभागीय कार्यालय येथील पथकातील पोहेकॉ सुरज पाटील , रमण सुरळकर ,यासीन पिंजारी यांनी प्रथम आरोपी करण सपकाळे यास वरणगाव जवळ रविवारी सानवी हॉटेलवर पकडले होते .तर इतर आरोपी जळगाव तालुक्यातील कंडारी येथे लपलेले असल्याचे गुप्त माहिती मिळाली असता . तेथे भिलवाडी मधील प्लाट विभागात संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे रा खडका हे दोघे आरोपी सोमवारी मिळून आले आहेत असून त्यांना भुसावळ तालुका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे . या प्रकरणात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक .विलास शेंडे , प्रकाश वानखेडे , अमोल पवार ,संजय तायडे , प्रेमचंद्र, सपकाळे दीपक जाधव ,योगेश पालवे , या गुन्ह्याचा तपास करत आहेत .
सदर कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .