. एप्रिल महिना म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चा महिना,दर वर्षी अनेक ठिकाणी विविध प्रकारे ही जयंती साजरी होत असते .या वर्षी महामानवाची जयंती वंचित बहुजन आघाडी तर्फे पुस्तके वाटप करून साजरी केली जाणार आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि या वर्षी बाबासाहेबांची 132 वी जयंती आहे.ही जयंती रॅली काढून आणि पुस्तके वाटप करून साजरी केली जाणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी दिली.
१४ एप्रिल दिनी सकाळी १०वाजता ,शहरातील संतोषी माता हॉल येथून अभिवादन रॅली ला सुरुवात होणार असून रेल्वे स्टेशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ समाप्त होईल.त्या नंतर पुस्तके वाटप करण्यात येणार आहे.तरी शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन रॅलीस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास जिल्हा प्रभारी अॅड .रविकांत जी वाघ यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून रॅलीत जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,जिल्हा महासचिव दिनेश इखारे,जिल्हा संघटक अरुण तायडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे,जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे,जिल्हा I T प्रमुख सचिन बाऱ्हे,महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक,जिल्हा उपाध्यक्षा मिरा वानखेडे,भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे,भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव
सहभागी होणार आहेत.