Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगाव येथील शारदा माळी यांना महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार प्रदान .


वरणगाव येथील शारदा माळी यांना महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार प्रदान .
वरणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या शारदा गंभीर माळी यांना नुकताच महात्मा फुले ब्रिगेड तर्फे महात्मा फुले समाज रत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . लातूर येथील विश्व पॅलेस मंगल कार्यालयात प्रस्तुत कार्यक्रम ९ एप्रिल रोजी संपन्न झाला असून या कार्यक्रमात त्यांना अभिजित भैया देशमुख व पत्रकार संघाचे अध्यक्ष नृसिह घोणे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
याप्रसंगी  सावित्रीबाई यांचे वंशज दिलीप नेवसे ' विक्रमजी काळे,'सतीश चव्हाण ,रमेश आप्पा कराड , बाबासाहेब पाटील , ह भ प रविकांत वसेकर महाराज , संतोष नागर मोजे ' शिवाजी माने ,कुलदीप सूर्यवंशी , राजाभाऊ चौगुले , अंकुश नाडे ,किसनजी चांभारगे मेघराजजी पवळे ,आनंदकुमार शिरसागर व महात्मा फुले ब्रिगेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदासजी महाजन आदी मान्यवर उपस्थित होते .
सदरचा पुरस्कार शारदा माळी यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार सर्व सामान्यां पर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने देण्यात आला आहे . याबद्दल त्यांचे वरणगाव परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे . शारदा माळी यांनी यावेळी . सर्व आयोजक व विरोषता चांभारगे यांचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.