प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचेकडून प्रकल्पाचा आढावा घेण्यात येऊन, त्यांच्याच हस्ते भूमिपूजन होण्यासाठी करणार प्रयत्न….
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांचा महत्त्वाकांक्षी आंतरराज्य मेगा रिचार्ज प्रकल्प योजनेचा दोन्ही राज्यांद्वारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झालेला असून, याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालय कडून मेगा रिचार्ज योजनेचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्यातील पाणी वाटप अंतिम करण्यासाठी दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.गजेंद्रसिंह शेखावत यांना मागील आठवड्यात भेट घेऊन मागणी केली आहे. त्यानुसार सदर योजनेच्या डीपीआर बाबत माहिती घेण्यासाठी आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी तापी विकास महामंडळ, जळगांव येथे भेट देऊन पुढील नियोजनाबाबत प्रमुख अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासोबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या दिल्ली येथील भेटीत लवकरच डीपीआर वर तपशीलवार आढाव्यासाठी बैठक घेण्यात येणार याबाबत माहिती देण्यात आली असून, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दोन्ही राज्यांचा पाणी वाटपाबाबत सुद्धा नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, सदर बैठक लवकरात लवकर लागण्यासाठी लवकरच केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.गजेंद्रसिंह शेखावत तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजजी चव्हाण यांना विनंती करणार असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीषजी महाजन यांची भेट घेऊन मागणी करणार आहे अशी माहिती यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.
तसेच आधीच सदर मेगा रिचार्ज प्रकल्पला वेळ झालेला असून, सदर वर्षाच्या शेवट पर्यंत या प्रकल्पाचे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदी यांचेकडून आढावा घेण्यात येऊन, त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी माहिती दिली, यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगांव अधिक्षक अभियंता श्री.य.का.भदाने, कार्यकारी अभियंता श्री.जी.एस.महाजन, कार्यकारी अभियंता श्री.यु.डी.दाभाडे, उपविभागीय अभियंता श्री.के.पी.पाटील ई. प्रमुख अधिकारी उपस्थित होते.