आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियानअंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने भाजपा जळगाव जिल्हा संघटनात्मक बैठक” मंगळवारी *भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे* यांच्या प्रमुख मार्गदर्शन व जिल्हातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित संपन्न झाली, यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
सर्व प्रथम भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांशी पत्रकार परिषदेत संवाद साधून दौऱ्याबद्दल माहिती दिली, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून जळगांव शहरात भाजपा जिल्हा कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत *मोटरसायकल रॅली* काढण्यात आली.
तसेच छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे संघटनात्मक बैठक घेण्यात येऊन, *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष आ.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे, संघटन मंत्री श्री.रविजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष आ.श्री.सुरेश भोळे, जिल्हाप्रभारी श्री.विजय चौधरी तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह* उपस्थिती बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे यावेळी आवाहन केले. यावेळी असंख्य नागरिकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी *प्रदेशाध्यक्ष आ.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे,* संघटन मंत्री श्री.रविजी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक कांडेलकर, डॉ.राजेंद्र फडके, जिल्हाध्यक्ष आ.श्री.सुरेश भोळे, जिल्हाप्रभारी श्री.विजय चौधरी, खासदार श्री.उन्मेष पाटील, आमदार श्री.संजय सावकारे, आमदार श्री.मंगेश चव्हाण, महानगर अध्यक्ष श्री.दिपक सुर्यवंशी, माजी आ.श्रीमती स्मिता वाघ, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, श्री.नंदकिशोर महाजन, श्री.पद्माकर महाजन, श्री.प्रल्हाद पाटील, श्री.राकेश पाटील, श्री.लालचंद पाटील, श्री.भरत महाजन, श्री. सुरेश धनके, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सौ.उज्वला बेंडाळे, भाजयूमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, श्री.योगेश, श्री.अमित सोळुंखे, भैरवी वाघ, श्री.सचिन पानपाटील, श्री.हर्षल पाटील, श्री.मधुकर काटे, श्री.विशाल त्रिपाठी व विविध आघाड्यांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व बुथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व असंख्य भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.