भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शाम फुलगावकर सात दिवसा पासुन उपोषणास बसलेला असुन सोमवारी फुलगावचे माजी सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेले पत्र हे दिशाभूल करणारे असल्याचे निवेदन उपोषणकर्ता शाम यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे .
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी वेळोवेळी मासिक सभेत गैरकारभारास विरोध करूनही प्रोसिंडीग मध्ये नोंद घेतली नाही , तसेच मी सभेचे व्हीडीओ चित्रण मागितले असता दिले गेले नाही .
सदर गैरकारभार लपविण्यासाठी हा प्रयत्न असुन माजी उपसरपंच यांच्या इशार्यावर हे सदस्य चालत असुन सरपंच व इतर सदस्य यात सहभागी असल्याचा माझा संशय आहे . मी उपोषणाच्या निर्णयावर ठाम असुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनात आहे .
दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांनी उपोषण स्थळी भेट देवुन उपोषणास पाठींबा जाहीर केला आहे व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे . यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते विलास मुळे, वरणगांव शहरप्रमुख संतोष माळी व शिवसैनिक उपस्थित होते .