फुलगाव येथील ग्रामपंचायत च्या कथित गैरकारभाराविरोधात माजी ग्रा पं सदस्य शाम फुलगांवकर गेल्या ७ दिवसा पासुन उपोषणास बसलेले असुन मंगळवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी उपोषण स्थळी भेट दिली असून अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले आहे .
यावेळी ग्रामविकास अधिकारी कढीखाये यांना बोलवून त्यांना प्रश्नांची सरबती केली एवढ्या दिवसापासून सदर व्यक्ती तुम्हाला माहिती मागत असताना तुम्ही का पुरवली नाही .तसेच ग्रामपंचायत मध्ये निधीचा भ्रष्टाचार होत असताना तुमची भूमिका काय होती . तसेच सीएसआर फंडाबाबत साडेबावीस लाखांचा रकमेचा काय विनिमय झाला हे सुद्धा विचारले यावेळी अधिकाऱ्यांना अखेर निरूत्तर व्हावे लागले . मी या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचेही आ . एकनाथराव खडसे यांनी यावेळी सांगितले . यावेळी ग्रामस्थांनी फुलगाव मधील अनेक समस्या सुद्धा आमदार खडसे यांच्याकडे बोलून दाखवल्या मी पूर्णपणे सहकार्य करणार असून निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय मी शांत राहणार नाही अशी यावेळी त्यांनी सांगितले .
आमदार एकनाथराव खडसे यांच्यासोबत यावेळी माजी नगरसेवक सुधाकर जावळे , राजेंद्र चौधरी , दीपक मराठे , शिवसेनेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन ,आदी उपस्थित होते .
प्रस्तुत उपोषण हे सुरु होतांना कोणत्याही पक्षाशी निगडीत नव्हते . परंतु सत्ता ही भाजप प्रणित होती व कोठेतरी अधिकारी यांच्या वर दबाव येणार का? हा प्रश्न निर्माण झाला असल्याने फुलगांव उपोषण प्रकरणाला आता चांगलाच राजकीय रंग चढत असून शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीने ही उपोषणाला साथ दिल्याने येथेही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष फुलगाव मध्ये तयार झाल्याचे दिसत होते . मात्र या प्रकरणात शासकिय अधिकारी यांच्यावरच ठपका ठेवला जाणार अशी प्रकरणाची वाटचाल दिसत आहे .