वरणगांव फॅक्टरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव २०२३आयुध निर्माणी व्दारा सार्वजनिक बौद्ध विहार प्रांगणात महात्मा ज्योतिबा फुले जयंती निम्मित जेष्ठ विचारवंत जयसिंग वाघ यांचे उदबोधन संपन्न झाले .
याप्रसंगी जयसिंग वाघ यांनी जुन्या चालीरिती , अंधश्रद्धा व महीलांच्या शिक्षणावर असलेल्या बंदी बाबत सखोल माहीती दिली अज्ञानामुळे समाजाचा नाश होतो हे लक्षात घेवुन क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला असे सांगितले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती समिती अध्यक्ष योगेश सपकाळे, सचिव पंकज हिरोळे, कोषाधक्ष सुभाष ससाणे , तपासणीस संतोष वानखेडे, शेखर सुरवाडे, मोहन इंगळे, प्रकाश इंगळे,सुमेध आचारे, उमेश वाघ , सत्यपाल राजपूत, विनोद शिरसाठ,ज्ञानेश्वर वानखेडे, सुरज पाल, दीपक सुरवाडे, अजय तायडे, संदीप तायडे, राहुल बावस्कर दिनेश वानखेडे, अजय इंगळे, आदींनी परिश्रम घेतले .