भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्राम पंचायतीचे माजी सदस्य हे कथीत भष्ट्राचार व कामात अनियमित्ता आरोप करीत मागील आठ दिवसा पासून कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले होते .
आ एकनाथ खडसे यांनी मंगळवारी उपोषण स्थळी भेट देऊन जि प मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती . त्या अनुषंगाने जळगांव . जिल्हा परिषदेचे उप मुख्याधिकारी अनिकेत पाटील यांनी भेट घेत पंधरा दिवसात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषण कर्त्याला लिंबू पाणी देऊन उपोषण सोडविले आहे .
माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम फुलगावकर यानी ग्राम पंचायतीच्या कारभारात गैरव्यवहार ,पैशाचा भष्ट्राचार , मासिक सभेचे प्रोसेडीग मध्ये खोटी माहिती लिहणे , ग्रामसभा न घेणे . शासकिय निधीचा गैरवापर करणे .अशा अनेक विषया बाबत माहीती आधिकारात माहीती मागूनही न दिल्याने दि ५ एप्रिल .बुधवार रोजी ग्रामपंचायत कार्यालया समोरा आमरण उपोषणास बसले होते . त्यांना गावातील नागरिकांनी व राष्ट्रवादी , शिवसेना (उ बाठा ) च्या समक्ष भेटून पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता . तर दि ११ मंगळवार रोजी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी फुलगाव येथे उपोषण कर्ते यांची भेट घेऊन त्यांच्या कडून माहीती जाणून घेत जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेचे उप मुख्याधिकारी अनिकेत पाटील व चौकशी अधिकारी एस . डी . पाटील हे फुलगावला उपोषण कर्ते श्याम फुलगावकर यांची भेट घेत येत्या पंधरा दिवसांत या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देऊन श्याम फुलगावकर यांना गावकऱ्याच्या साक्षीने लिंबुपाणी देऊन उपोषणाची सांगता केली . आहे . उप मुख्याधिकारी यांच्या लेखी पत्रात जिल्हास्तरीय चौकशी समीती नेमून या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन येत्या पंधरा दिवसांत चौकशीचा अहवाल वरिष्ठाकडे सादर करणार असल्याचे नमुद असल्याने याची खात्री झाल्याने उपोषणाची सांगता केल्याचे श्याम फुलगावकर यांनी सांगितले आहे .
यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थीत होते .