सातबाराच्या उताऱ्यावर शेतीची नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने बारा हजाराची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी पंटरासह कोतवालला जळगाव एसीबी पथकाने मंगळवारी दुपारी एक वाजता ताब्यात घेतले आहे यामुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे रवींद्र धांडे असे अटकेतील कोतवालांचे नाव आहे
जळगाव एसीबीचे पर्यवेक्षक संजोग बच्छाव व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला शेतीची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर कोतवालांना भेटण्यास सांगितल्यानंतर रवींद्र धांडे यांनी अकरा हजार रुपयाची लाच मागितली केवळ लाच द्यायची नसल्याने एसीबी कडे तक्रार म्हणून सापळा रचण्यात आला मंगळवारी दुपारी कोतवाल खाजगी पंटर कडे लाच देण्याचा इशारा केल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले पोलीस इन्स्पेक्टर संजय बच्छाव व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली एसीबीच्या कारवाईनंतर तहसील कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली आहे