अखेर कुठपर्यंत या भुसावळ च्या जनतेला दूषित व अनियमित पाणीपुरवठा सहन करावा लागणार वाटर सप्लाय मधील जलशुद्धीकरण संच असो, नाहटा महाविद्यालय जवळील जलकुंभाची असलेली जीर्ण अवस्था असो किंवा जीर्ण झालेली पाईपलाईन असो सर्वच बाबतीत पाणी पुरवठा विभाग कुठंतरी कमी पडतोय. अमृत योजनेचे काम गेल्या अनेक दिवसांपासून चालूच आहे ते कधी पूर्ण होणार? नाशिक विभागातील एकमेव *अ* दर्जा प्राप्त आपली नगरपालिका या शहरात अनेक सरकारी कर्मचारी तसेच अनेक व्यापारी सर्व राहतात वेळेवर पाणीपट्टी असो किंवा इतर टेक्स असो सर्व देतात पण कसला पाणी पुरवठा आपण गेल्या काही वर्षांपसून करत आहात एकप्रकारे शहरातील नागरिकांच्या जीवाशी नगरपालिका खेळत आहे आज दवाखाने किती महागलेत, अशी आग्रहाची विनंती आहे की जनतेचा होणारा छळ आपण लवकरात लवकर थांबवावा व जनतेला स्वच्छ व आरोग्यदायी पाणी द्यावे.
अन्यथा शिवसेना या भुसावळ च्या जनते साठी आणि पाण्याच्या प्रश्न मिटविण्या साठी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.असा इशारा शहर प्रमुख दिपक धांडे,तालुका प्रमुख संतोष सोनावणे, विधानसभा शेत्रा प्रमुख निलेश महाजन,उप शहर प्रमुख स्वप्नील सावळे,शरद जोहर यांनी दिला आहे