बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मेळावा वरणगाव येथील भाग्यलक्ष्मी लॉन येथे नुकताच पार पडला असून यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे , संतोष चौधरी ,रवींद्र भैया पाटील , राजेंद्र चौधरी , दिपक मराठे , सुधाकर जावळे , आदी उपस्थित होते .
यावेळी जळगाव जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजय आमचाच होणार असे राष्ट्रवादीचे नेते नाथाभाऊंनी मेळाव्यात सांगितले आहे .
यावेळी माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी सांगितले की ईश्वराच्या कृपेने मी न्यायालयात निर्दोष सुटलो असून आता एकनाथराव खडसे यांच्यासोबत काम करून सहकार खात्यात व इतर राजकीय ठिकाणी अधिकाधिक पक्ष कसा बळकट करण्यात येईल यासाठी आम्ही मेहनत घेवु . ज्यांना आम्ही शिकवले त्यांनी आम्हाला शिकवु नये . आम्ही दोघे एकत्र आल्याने भाजप नेत्यांना मळमळ होत असल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी एकनाथराव खडसे यांनी सांगितले की शिंदे फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी शेतमजूर हवालदिल झाला आहे . वादळी पावसाने भयंकर नुकसान झाले आहे . परंतु मुख्यमंत्र्यांना अयोध्या व आसाम वारी करायला वेळ मिळत आहे . शेतकऱ्यांच्या साठी वेळ नाही या सरकारमधील आमदारांना शेतकऱ्यांशी काहीही घेणे देणे उरलेलं नाही , कृषी उत्पन्न बाजार समितीत अशा लोकांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन सुद्धा यावेळी नाथा भाऊंनी केले आहे .