Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


फुलगांव जवळील कोळसा चोरी प्रकरणी चौघाना अटक



भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात वरणगाव वरून फुलगाव मार्गे मालगाडी द्वारे कोळशाची वाहतूक होत असते परंतु विद्युत केंद्रात कोळशाचे रॅक पोहोचण्याआधी फुलगाव ते विद्युत केंद्रापर्यंत चोरटे मालगाडीवर चोरुन कोळसा खाली फेकत असतात व तो कोळसा रुळाच्या आजूबाजूंनी पडत असतो तो कोळसा ट्रॅक्टर मध्ये भरून अवैद्य मार्गाने विक्री करीत असतात .
याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला सुरक्षा अधिकारी यांनी गुन्हा दाखल होता . त्यातील आरोपी हे फरार होते वरणगाव पोलिसांनी  गुप्त माहीती च्या आधारे २८ एप्रिल रोजी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या व त्यांना अटक केली आहे . हे सर्व संशयित आरोपी फुलगाव येथील रहिवासी आहे . त्यातील रितेश रविकांत शिंदे , बाबूलाल सोनवणे , लक्ष्मण रमेश सोनवणे , संतोष रतन सोनवणे यांना अटक करण्यात आली आहे , पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परशुराम दळवी हे करीत आहे . त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आली आहे .
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा चोरीचे प्रमाण वाढले आहे या चोरीला आळा कधी बसणार अशी सर्वसामान्य मध्ये चर्चा सुरू आहे की यांना राजकीय अभय आहे अशा चर्चां रंगताना दिसत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.