Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पाचोरा बाजार समितीत १८ जागांसाठी ९८ . २२ टक्के मतदान*- ३३४३ मतदारांपैकी ३२७८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क...

  [ सतिष पाटील प्रतिनिधी ]

 पाचोरा - भडगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तिरंगी लढतीत चुरशीचे व विक्रमी मतदान झाले. बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ३३४३ मतदारांपैकी ३२७८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकुण ९८ . २२ टक्के मतदान झाले असुन भरघोस मतदान झाल्यामुळे तिनही पॅनलमध्ये चुरशीची लढत झाल्याचे दिसुन येते. पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांची मतदान प्रक्रिया ही शहरातील गो. से. हायस्कुल येथे एकाच ठिकाणी करण्यात आली होती. सोसायटी मतदार संघात ११ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. त्यात पाचोरा - भडगाव तालूके मिळुन १५३४ मतदान पैकी १५०५ मतदान झाले. ग्रामपंचायत मतदार संघांच्या ४ जागांसाठी १२ उमेदवार निवडूक रिंगणात आहेत. त्यात १२६८ मतदानापैकी १२४४  मतदान झाले. व्यापारी मतदार संघाच्या २ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात असुन यात २७३ मतदारांपैकी २६४ यांनी मतदान केले. तर हमाल मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी ३ उमेदवार निवडून रिंगणात असुन यात २७२ मतदानापैकी २६५ मतदान झाले.

    पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी शिंदे सेनेत भाजपाचे दोन, महाविकास आघाडीत व भाजपाचे स्वतंत्र पॅनल अशा तीन पॅनलमधे अतिशय चुरशीची लढत झालेली आहे. आमदार किशोर, माजी आमदार दिलीप व वैशाली सुर्यवंशी आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी तीन पॅनल तयार करून आप - आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 
पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत अतिशय धिम्या गतीने मतदार झाल्याने सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत ३.११ टक्के, दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत १६.५० टक्के मात्र दुपारी बारा वाजेनंतर महिला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी निघाल्याने बारा ते दोन वाजेपर्यंत ५१.८५ टक्के मतदान तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत विक्रमी ९८.२२ टक्के मतदान झाले आहे. दुपारी २ वाजेपासुन प्रत्येक बुथवर मोठ - मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी २.०० ते २.१० पर्यंत दहा मिनिटं जोरदार पाऊस झाल्याने मतदार व उमेदवारांची पळापळ झाली होती. श्री. गो. से. हायस्कूल या एकमेव मतदार केंद्राबाहेर आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सुर्यवंशी,प्रतापराव पाटील, पूनम पाटील, अमोल शिंदे, सतिष शिंदे हे ठिय्या मांडून बसले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नामदेव सुर्यवंशी, सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे हे काम पहात आहेत. यावेळी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या बाजार समितीतील निवडणुकीत ६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असुन ३० एप्रिल रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.