८ एप्रिल रोजी सकाळी अकोला येथील कापड बाजार राम मंदिर भागातील रहिवासी किरण अठवाल हा कंडारी येथे सुरेश म्हसकर या नातेवाईकाकडे कार्यक्रमासाठी आला होता . त्यांच्यासोबत कंडारी जवळ तापी नदी पात्रात महादेव मंदिराजवळील स्मशानभूमी जवळ आंघोळीस गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने किरण शिवशंकर आठवाल वय २२ ह्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली . हा तरुण नातेवाईकांकडे कार्यक्रम निमित्त अकोल्याहून आला असता . घटनेची माहीती मिळताच पोलीस पाटील रामा तायडे यांनी धाव घेत पोलीस प्रशासनाला माहिती दिली. तसेच घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरतात तात्काळ कंडारी चे सरपंच दीपक तायडे व समाजसेवक अजय मोरे यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली .
यावेळी
गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती खोल पाण्याचा अंदाज न आल्याने किरण हा तरुण बुडाल्याची पोलीस पाटील यांनी माहिती दिली. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन करीत आहे.