Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळला जळगांव स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन लाखाचा गुटखा जप्त .

   

        स्थानिक गुन्हे शाखा जळगांव च्या पथकाने शनिवारी दुपारी भुसावळात केलेल्या कारवाईत वसंत टाकीज जवळील गायत्री पान सेंटर व मालकाच्या घरून सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे .
या पान सेंटरवर बंदी असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती एलसीबी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली . यानंतर पथकाने वसंत टॉकीज जवळ व जळगाव रोडवरील दुकानावर कारवाई केली त्यात बंदी असलेला गुटखा सुगंधी तंबाखू मिळाली पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून शहर पोलीस ठाण्यात आणला . तेथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती या पथकात डी वाय एस पी आप्पासो पवार ,डी वाय एस पी सतीश कुलकर्णी , उपनिरीक्षक गणेश वाघमारे , सहायक फौजदार युनूस शेख आदींचा समावेश होता . पोलिसांनी दोन जणांना चौकशी कामे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे .
भुसावळ तालुक्यामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.