भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम फुलगावकर हा युवक चार दिवसापासून ग्राम पंचायत समोर उपोषणाला बसला असून आज फुलगाव तीनशे ते चारशे महिला पुरुष सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे . गावातील महिला व पुरुष जमा झाले होते . त्यांनी गावातील समस्यांचा पाढाच वाचला . पाणीपुरवठा योग्य पद्धतीने होत नसून गावात सुविधांचा अभाव आहे .
येथील पुढारी गावासाठी कोणती सुधारणा करत नसल्याचे यावेळी महिलांनी आक्रमक पद्धतीने सांगितले . सदरची ग्रामपंचायत बॉडी बदलायचा सुद्धा यावेळी निर्णय घेण्यात आला आहे .
गावातून महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून दिपनगर कडून मोफत पाणी मिळत असताना येथील पुढाऱ्यांनी हे नाकारले असल्याचे सांगितले . तसेच दिपनगर कडून उपलब्ध होणारा निधी या ठिकाणी कोणत्या पद्धतीने वापरला जातो याबद्दल कोणती माहिती मिळत नसल्याचे यावेळी सांगितले . वरीष्ठांनी . याची त्वरीत दखल घ्यावी अनथा आंदोलन तीव्र होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .