भुसावळ शहरात तापमानाचा पारा वाढत आहे . त्यातच भुसावळ शहरात गेल्या दिड महीन्या पासून काही भागात केवळ नियोजन अभावी नागरीकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे .
तुकाराम नगर , गुंजाळ कॉलनी , नाहाटा कॉलेज कडील काही भागात १५ दिवसा पासुन नगरपालीके ने पाणी सोडलेले नाही . लोखंडी पुलाजवळ गडकरी नगर व नाहाटा कॉलेज जवळील जलकुंभाच्या पाईप लाईनचे विभाजनाचे काम पूर्ण झाल्यावर दर चार दिवसांनी शुद्ध पाणी मिळेल असे भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकारे यांनी खाजगी वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते . काम ही पूर्ण झाले परंतु या आमदारांच्या शब्दाला भुसावळ नगरपालिकेच्या अधिकार्यांनी गाजर दाखविले आहे . प्रशासकीय .काळात नगर पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लोक प्रतिनिधी नगरसेवकांचा वचक राहीला नाही असा सुर जनतेमध्य आहे . .पाणीपुरवठा विभाग सत्ताधारी आमदारांच्या शब्दाचा मान ठेवत नसेल तर नागरीकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे . भुसावळातील एका भागातील नागरीकांनी चक्क नगरपालिका पाणीपुरवठा विभागात आंघोळी केल्या . यासारखी शोकांतिका कोणत्याही शहरात नाही . तापी नदी उशाला व कोरड घशाला अशी भुसावळची परिस्थती आहे . नेते मंडळी सुद्धा लांबणीवर पडलेल्या केवळ अमृत योजनेचे स्वप्न दाखवून नागरीकांची वेळ मारून नेत आहे. डिव्हायडरवर पेटींग करून शहराचा विकास दाखविणार्या नगरपालीकेने आधी नागरीकांच्या रस्ते ,पाणी , गटारी . या सारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे . नगरपालीकेच्या मुख्याधिकारी साहेब , माजी व भावी नगरसेवक यांनी या प्रश्नाकडे .लक्ष देण्याची गरज आहे . नाहीतर जनता रस्यावर उतरून आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही .