Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


यावल तालुक्यातील दहीगाव येथे महापुरुषांच्या फलकाची विटंबना . गावात तणाव पूर्ण शांतता




यावल तालुक्यातील दहिगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या फलकाची विटंबना करण्याचा प्रकार शनिवारी रात्रीच्यावेळी घडला प्रकार हा रविवारी सकाळी उघडकीस आला असता गावात समाज बांधव जमा झाले . यावेळी सदर प्रकार पोलीस स्टेशनला  कळविण्यात आला . फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ . कुणाल सोनवणे ,यावल पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर व पोलीस स्टाफ त्वरित घटनास्थळी पोहोचला . यावेळी पोलिस चौकी रुमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले . पोलीस अधिकारी . सरपंच यांनी  समाज बांधवांना शांत राहण्याचे सांगितले . आणि त्वरित विटंबना झाल्याच्या फलकाला शुद्धीकरण केले . तसेच हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेवुन कारवाई करण्याचे सांगितले . दहिगाव परिसरात या घटनेमुळे तणावपूर्ण शांतता असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . या गावी जाणाऱ्या बस सुद्धा रद्द करण्यात आल्या असून कोणत्याही अफवा वर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे . जळगांव . जिल्ह्यातील ही तर तिसरी घटना दहिगाव घडलेली आहे . नेमके कोण समाजकंटक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे हे शोधून काढण्याची कार्य पोलीस करतीलच याच शंका नाही . परंतु इतर कोणत्याही राजकीय नेत्यांनी त्यांना पाठीशी घालू नये असे सुद्धा जनमानसात बोलले जात आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.