Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथील गोळीबार प्रकरणातील एक आरोपीला वरणगाव येथे अटक


     भुसावळ येथील साकरी उड्डाणपुलाजवळ १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी करण  संतोष .सपकाळे हा वरणगाव परिसरात लपून बसलेला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती . त्या अनुषंगाने वरणगांव पोलिसांनी त्यास हॉटेल जान्हवी जवळ सापळा रचुन अटक केली आहे .
सुरवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती पण पोलिसी खाक्या दाखवताच गोळीबार प्रकरणातील आरोपी असल्याचे त्यांने सांगितले  . 
सदर आरोपीची वरणगांव ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे . 
सदर प्रकरण घडल्यानंतर आरोपी हा सुसरी जवळ असलेल्या आसरा मंदिराच्या जवळ असलेल्या वनखात्याच्या परिसरात लपून बसला होता . दोन दिवसा पासुन वरणगांव पोलीस त्याचा शोध घेत होते . रविवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जान्हवी हॉटेल  जवळ तो जेवणासाठी आला असता  वरणगाव पोलीस स्टेशनचे स .पो. नि . आशिष अडसूळ , पी एस .आय परशुराम दळवी , इस्माईल शेख व पो हे कॉ प्रशांत ठाकूर , भूषण माळी  यांनी त्यास अटक केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.