Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव येथे रमजान ईद उत्साहात साजरी .अक्षय तृतीया व रमजान ईद एकाच दिवशी आल्याने सर्व धर्म समभाव पध्दतीने हिंदू -मुस्लीम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतांना दिसत आहेत


वरणगाव येथे मुस्लिम बांधवा तर्फे रमजान ईद उत्सव उत्साहात संपन्न झाला .वरणगाव येथे ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली . तसेच या ठिकाणी हिंदू बांधव सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे , शेख अखलाख , ' मुस्लीम अन्सारी , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर , शेख सईद, हिप्पी शेठ , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र  चौधरी , माजी नगरसेवक सुधाकर जावळे, रवी सोनवणे ,दीपक मराठे , मिलींद मेढे , अरुणाताई इंगळे , कॉंग्रेसचे अशफाक काझी  , वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ , पीएसआय परशुराम दळवी , पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल येवले व अन्य पोलीस स्टॉफ उपस्थित होते . त्यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना अक्षय तृतीयाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी पैकी एक या सणांच्या शुभेच्छा दिल्या आहे . आज हिंदूंचा व मुस्लिमांचा दोघांचा सण असल्याने सर्वत्र सर्वधर्मसमभाव पद्धतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत . यात दोघा समुदायाला वेगळा आनंद मिळत आहे. अनेक वर्षा नंतर हा योग जुळून आला आहे . ईंद मुबारक व अक्षया तृतीया च्या शुभेच्छा या पद्धतीने वरणगाव परिसरात प्रत्यक्ष भेटून व सोशल मिडीयातून शुभेच्छा देणे सुरु आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.