Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


लक्झरी च्या धडकेने ६५ वर्षीय सायकल स्वार ठार वरणगांव फॅक्टरी लगतची घटना

 
भुसावळ तालुक्यातील वरणगांव फॅक्टरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर लक्झरीच्या धडकेमुळे ६५ वर्षीय सायकल स्वार ठार झाल्याची घटना शनिवारी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे .
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहीती नुसार वरणगांव फॅक्टरी लगत असलेल्या भीमनगर मधील रहिवाशी सुकलाल शेनफडू वाघ , वय ६५ मजूरीचे काम करून सायकलीने तळवेल येथुन घरी येत असतांना रस्ता ओलांडताना मुक्ताईनगर कडून वरणगांव कडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स ने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात सुकलाल वाघ हे जागीच ठार झाले . आहे . तळवेल गावच्या रहिवाशांनी त्यांना वरणगांव ग्रामिण रुग्णालयात आणले . त्यांचे शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
 याबाबत  वरणगांव पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदया नुसार लक्झरी चालकाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
  मयत सुकलाल यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुली असा परिवार आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.