Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ गोळीबार प्रकरणातील तरुणाचा मृत्यू .

 भुसावळ येथील १४ एप्रिल रोजी साकरी उड्डाणपुलाजवळ तीन तरुणांनी केलेल्या गोळीबारात अक्षय रतन सपकाळे रा खडका .हा गंभीर रित्या जखमी झाला होता . त्यांच्या पोटावर गोळीबारात जखमा झाल्या होत्या तसेच त्याच्यावर जळगांव येथे उपचार सुरु होते . त्याचा आज शनिवारी सकाळी नऊ वाजता रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालेला आहे . या घटनेतील आणखी एक तरुण मंगेश अंबादास काळे  हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे . 
हे गोळीबार प्रकरण पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती मिळत होती पण तरुणाच्या मृत्युमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
सदरच्या घटनेने भुसावळ पोलिसाच्या ताब्यात असलेले या घटनेतील संशायित .आरोपी करन सपकाळे, संतोष सपकाळे व जीवन सपकाळे रा खडका ता भुसावळ  यांच्या वर खुनाचे कलम वाढण्याची शक्यता आहे . सदर घटना घडल्यानंतर तीनही आरोपी फरार होते . परंतु पोलिसांच्या  संयुक्त पथकाने  तिघांना अटक केली होती .
 डी .वाय .एस .पी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पो.स्टे.चे .पोलीस निरिक्षक  विलास शेंडे . सपोनि प्रकाश वानखडे या घटनेचा तपास करीत आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.