Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगांव लोक न्यायालयात २७ खटले निकाली


    सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
  दिनांक 30/4/2023 रोजी माननीय दिवाणी व फौजदारी न्यायालय भडगाव जिल्हा जळगाव येथे राष्ट्रीय लोक  आदालतिचे आयोजन माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे निर्देशाप्रमाणे माननीय तालुका विधी सेवा समिती भडगाव व माननीय वकील संघ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आले होते.                      
 सदर लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादकपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्यासाठी ठेवण्यात आले होते. सदर लोकन्यायालयात 19 प्रलंबित प्रकरणे व 8 वादपुर्व प्रकरणे असे  एकूण 27 प्रकरणी निकाली काढण्यात आली व तसेच रक्कम रुपये सहा लाख नऊ हजार सातशे चार रकमेची तडजोड देखिल करण्यात आली.            लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती एस एस चव्हाण सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर भडगाव व पॅनल सदस्य म्हणून भडगाव वकील संघाचे अध्यक्ष रणजित राजेंद्र पाटील कनाशिकर यांनी कामकाज पाहिले. सदर लोकन्यायालयात भडगाव वकील संघाचे सर्व विधीज्ञ पक्षकार तसेच माननीय तालुका विधी सेवा समिती भडगाव चे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.