Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


नकली सोने असली सोने भासवुन फसवणूक करणारी राजस्थान राज्यातील टोळी भुसावळ येथे जेरबंद



 
भुसावळ शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये चार ते पाच दिवसापासून दोन्हीं इसम काचेचे  बनवलेले मंदिर विकण्याचा बहाण्याने लोकांना संपर्क करून  इतर विषयाची चर्चा करून आमच्याकडे असली सोन्याच्या दागिने आहेत ते मला खोदकाम करताना जमिनीत मिळून आले आहेत . सदर सोने एक ते दीड किलोचे असून कोणालाही कळू न देता पाय लाख रुपये विकणे आहे . असे लोक सांगतात संपर्क चालू असता त्यांच्याकडून रक्कम उकळून त्यांची फसवणूक करतात .अशी गुप्त माहिती पोलीस विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे साहेब यांना मिळाली असता पोलिसांचे पथक तयार करण्यात आले , या पथकात पोलीस हवालदार सुरज पाटील , रमण सुरडकर , यासीन पिंजारी हे होते . यांनी याबाबत पथकाद्वारे रात्रंदिवस फिरून सदर आरोपी चाणाक्ष असल्याने वेळोवेळी गुंगारा देत होते , परंतु हे दोन्ही इसम शिवपुर कन्हाळा रोड जवळ वर्ड स्कूल जवळ असल्याचे माहिती मिळताय पथक त्या ठिकाणी पोहोचले 'आरोपीच्या हातातील नकली सोन्याच्या दागिने तपासून हातात घेतले व जवळील नकली .पाचशे रुपयांचे नोटांचे बंडल आरोपीच्या हातात घेऊन हात वर करून पथकाला इशारा दिला , या पथकाने सदर व्यक्तीवर झ . 
 एक किलो वजनाचे बनावट सोने हा मुद्देमाल या आरोपीकडून हस्तगत केले असून आरोपीचे नाव किसनलाल दौलतराम बागडी , वय 36 ,राहणार बल्लूर , तालुका जिल्हा शिरोही ,राजस्थान , a बाबूलाल बाबाराम बागरी , वय 42 , राहणार लक्ष्मी नगर , बिबलसर ,तालुका जिल्हा जालोद ,राजस्थान असे यांनी सांगितले आहे .
 सदर आरोपी विरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गु . र नं . 69 /23 भारतीय दंड विधान कलम 406 , 417 ,420 ,34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक एम राजकुमार , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी ,विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे ,यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे , पोलीस कॉन्स्टेबल सुरज पाटील , रमण सुरडकर , गणेश राठोड , यासीन पिंजारी आदी करीत आहे . पोलिसातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की भूलथापांना बळी न पडता बनावट सोने देण्याच्या बहाण्याने अशी व्यक्ती दिसल्यास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनची संपर्क साधावा .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.