कर्जाच्या जाचाला कंटाळून जळगाव तालुक्यातील वडली येथील शेतकरी कुटुंबातील तिघांनी एकाचवेळी विष प्राशन केले होते. त्यांना ताबडतोब शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये वडीलांचा मृत्यू झाला तर आई आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. ही माहिती मिळताच पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल गाठले व या कुटुंबातील आई आणि मुलाची भेट घेतली.
आत्महत्या पर्याय नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी विनंती ना.गुलाबरावजी पाटील यांनी त्यांना केली. यावेळी सोबत जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ सोनावणे, वडलीचे माजी सरपंच सचिन पाटील, मोहाडी सरपंच धनंजय सोनावणे उपस्थित होते.