दिनांक 7 एप्रिल रोजी पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची संस्था असलेल्या पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य,विकास सोसायटी संचालक व शेतकरी बांधवांचा सहकार मेळावा पासर्डी ता.भडगाव येथील मातोश्री जिनिंग येथे आयोजित करण्यात आला होता...!*
*यावेळी पाचोरा-भडगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.किशोरआप्पा पाटील व शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब (जिभु) पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले!*
*यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व इच्छुक उमेदवार,शिवसेना-युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.