भुसावळ शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील शिक्षकाने शहरातील १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे . गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे हे कृत्य आहे . घटनेची नोंद भुसावळ शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .या घटनेतील आरोपी शिक्षक अभिजित पाल, वय ३२ , पंचमुखी हनुमान मंदीरा जवळ भुसावळ यास शनिवारी अटक केल्याची माहीती पोलीस सुत्राकडून मिळाली आहे .
सदरची घटना जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान घडली होती . याप्रकरणी पिडीता हिस त्रास असहय झाल्याने तिने शुक्रवारी शहर पोलिसांत तक्रार दिली होती .
खान्देश करिअर अॅकेडमी हे स्पर्धा परिक्षा . मार्गदर्शन केंद्र असून आरोपी तेथे शिक्षक आहे . त्याने क्लासमध्ये , फिल्टर हाऊस भागात व ग्राउंडवर रनिंगचा सराव करताना वेळोवेळी विनयभंग केल्याचा आरोप आहे . या शिवाय संशयित पाल याने विद्यार्थिनीच्या नकळत तिचे फोटो मोबाईल मध्ये काढले होते .तसेच अश्लील इशारे करीत तरुणीस कॉफी पिण्यासाठी चल असा आग्रह करून तरुणीचा विनयभंग केला होता . पिडीतेने हा त्रास असह्य झाल्यानंतर शुक्रवारी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर रात्री उशिरा संशयित अभिषेक पाल या शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास सहायक फौजदार मोहम्मद सैय्यद करीत आहेत .