वरणगांव येथील ऐतिहासीक नागेश्वर मंदिर प्रांगणात दर्शना साठी . आलेल्या भाविकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे .
शुक्रवारी सायंकाळी नागेश्वर मंदीरा जवळ चार युवक बियर पीत बसले होते . त्यावेळी तेथे तपत कठोरा येथिल दिनेश कोळी हे सपत्निक दर्शनासाठी आले असता त्यांचेवर चौघापैकी एकाने बियर च्या बाटलीने हल्ला करून जखमी केले आहे .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि . १४ एप्रिल रोजी ड्राय डे असतांना सुद्धा काही अल्पवयीन मुले नागेश्वर मंदिरात बिअर पिऊन धिंगाणा घालत होते . त्यावेळी एकाने दिनेश सुरेश कोळी (कठोरा ) याचे डोक्यावर बिअर ची बाटली फोडून जबरदस्त प्रहार केला . त्याने या घटनेची माहिती आपला मावस भाऊ सागर रविन्द्र कोळी (22) फुलगाव यास कळविली ' तो तेथे नेमके काय घडले हे पहाण्यासाठी गेला असता त्याचेवर सुद्धा चौघांनी हल्ला चढवून त्याचा हात फ्रॅक्चर केला असल्याचे वृत्त आहे .
याबाबत वरणगांव पोलीस ठाण्यात र गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यानंतर कोळी समाज नेते महेश सोनवणे यांनी दोघांपैकी एकास जळगांव व दुसऱ्यास भुसावळ येथे हलविल्याचे सांगीतले . .पुढील तपास एपीआय आशिष अडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे .
नागेश्वर मंदिर परिसर बनलाय मद्यपींचा अड्डा
दरम्यान येथील बोदवड रोड वरील सुप्रसिध्द पुरातन नागेश्वर मंदिराचा भव्य दिव्य परिसर थोडा अंधार पडल्यानंतर मद्यपींचा अड्डा बनतो . याठिकाणी अल्पवयीन मुले व तरुण बिअर बार मधील जास्तीचा खर्च वाचविण्यासाठी वाईन शॉप वरून पार्सल व चखना घेऊन जातात व बिनधास्तपणे आपली मद्यपान करतात . एखादा व्यक्तीनी याबाबत बोलले तर शिविगाळ व . मारहाण करण्यात येते . तसेच काही तरुण तरुणी या ठिकाणी अश्लीळ चाळे करण्यासाठी तेथील अपूर्ण बांधकामाचा सहारा घेतात . व मंदिर परिसराचे पावित्र्य भंग करून बऱ्याच वेळा नासधुस करतात . त्यासाठी पोलीस प्रशासनाने याकडे जातीने लक्ष्य देवून या प्रकारास आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे . व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत .