Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कोठली येथील लाडका पवन नावाचा घोड्याची प्राण ज्योत मावळली . शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यविधी .

   ऐ मेरे दोस्त लोटके आजा.. अब तेरे बीन जिंदगी अधुरी है। या हिंन्दी गीताचा प्रत्यय कोठली येथे आला आहे . घटना कोठली येथील लाडक्या पवन घोड्याच्या मृत्युबाबत आहे . या परिसरातील लाडक्या घोड्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यावेळी मालकाच्या परीवाराचा आक्रोश नमूद करण्या सारखा होता . तसेच अंत्ययाञेला ४०० जवळपास लोकांची उपस्थिती होती संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे . 
 याघटनेचा आढाव घेतला आहे . दिव्य महाराष्ट्र न्युज चे भडगाव तालुका प्रतिनिधी सतिष पाटील यांनी
        
सारंगखेडयाच्या याञेतुन आणलेले छोटे १ वर्षाचे घोडयाचे पिलु. या घोडयाचे नाव ठेवले प्रेमाने पवन. परीवारातील सदस्या प्रमाणे या पवन घोडयाला परीवारातील सदस्यांनी जीव लावुन वेळोवेळी प्रेम देउन वाढविले. लग्न कार्यात वा २६ जानेवारी यासह विविध कार्यक्रमांना या पवन घोडयाला सजवुन मिरवणुकीत आपले नाव रोशन केले. माञ २ दिवसापासुन या घोडयाला अचानक आजाराने कवटाळले. पशुवैदयकीय औषधोपचार चालु असतांना दि. १८ रोजी ८.३० वाजेच्या सुमारास परीवारासह शेकडो लोकांच्या उपस्थितीत पवन घोडयाने आपले प्राण सोडले. पवन नावाने आरोळी मारताच हावभाव करणारा, मान डोलावणारा, किंकाळीरुपी आवाज देणार्या पवन घोडयाने जमिनीवर मान टाकीत त्याची प्राणज्योत मालविल्याची घटना घडली. घोडा मालक विनोद बापुराव पाटील रा. कोठली. ता. भडगाव. जि. जळगाव यांचे परीवारासह उपस्थित नागरीक, महिलांना रडु कोसळले. यावेळी मोठा आक्रोश करण्यात आला. आणि राञी शेकडो नागरीक, तरुण, महिलांच्या उपस्थित माणसाप्रमाणे पुजा,  अर्चा, विधी करुन या पवन घोडयावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घोडयाची किंमत अंदाजे दिड ते दोन लाख आहे. शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या घटनेने संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ए मेरे दोस्त लोटके आजा.. अब तेरे बीन जिंदगी अधुरी है। या हिंदी चिञपटाच्या गीता प्रमाणे सोशलमिडीयासह व्हाॅटसपवर शेकडो तरुणांनी या गिताचे स्टेटस ठेवले होते. या पवन घोडयाची या हिंदी गितावर सोशलमिडीयावर ऐ मेरे दोस्त लोटके आजा.. अब तेरे बीन जिंदगी अधुरी है। या हिंदी चिञपट गिताचे गाणे गुणगुणतांना दिसत असुन लाडक्या पवन घोडयाच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे दिसुन आहे. याबाबत माहिती अशी कि, भडगाव तालुक्यातील कोठली येथील आदर्श शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य विनोद बापुराव पाटील यांना गायी, म्हशीसह जनावरे पालनाचा मोठा छंद व व्यवसायही जोपासला आहे. विनोद पाटील यांचे भाचे सुरेश बोरसे माजी सरपंच चिंचखेडे ता. चाळीसगाव जि. जळगाव यांनी सन २०१० मध्ये सारंगखेडयाच्या याञेतुन १ वर्षाचे हे घोडयाचे पिलु आणले होते. परंतु मामा विनोद पाटील कोठली यांनी हया घोडयाच्या पिलुची मागणी केली. हा घोडा मामाला दिला म्हणजे माझी कायम भेट होईल या भावनेने भाचा सुरेश बोरसे चिंचखेडे ता. चाळीसगाव यांनी मामा विनोद पाटील कोठली ता. भडगाव यांना सन २०११ मध्ये फक्त ५१ हजारांना हा घोडा दिला. हा घोडा तेव्हा फक्त दोनच वर्षांचा होता. विनोद पाटील यांनी या घोडयाचे नाव पवन असे ठेवले. परीवारातील सदस्यांप्रमाणे या घोडयाला जीव लावला. घोडयाला हिरव्या चार्यासह खुराक लावला. विनोद पाटील यांचेसह परीवाराला या घोडयाचा चांगलाच प्रेमाचा लळा लागला. या पवन घोडयाला ट्रेनिंग देत परीसरात व तालुक्यात लग्न कार्यात वरातीत, गावात शिवजयंती मिरवणुक, जिजामाता जयंती, १५ आँगष्ट प्रजासत्ताक दिन , २६ जानेवारी स्वातंञ्य दिन अशा विविध कार्यक्रमात या पवन घोडयाला सजवुन मिरवणुकीत नेत असतं. नेहमी घोडया सोबत विकी पाटील व गोपाल पाटील हे दोघेही राहायचे. त्यांनी पवन म्हणताच हावभाव पाहत हा पवन घोडा इशारावर चालायचा. विशेष म्हणजे डीजे व बँडच्या आवाजातही हा पवन घोडा बिथरला नाही. गर्दीत कुणाला लाथ मारली नाही. विशेष म्हणजे सोबतच्या विकी पाटील वा गोपाल पाटील यांनी या घोडयाची शेल, दोरही हातात पकडला नाही. या पवन घोडया सोबत वरात वा मिरवणुक चालायची. पवन थांब, पवन पुढे चाल असे म्हणताच पवन चालायचा वा थांबायचा वा नाव सांगताच किंकाळी देत साद दयायचा. एवढा हुशार हा पवन घोडा होता. सुरेश बोरसे चिंचखेडे ता. चाळीसगाव यांचे लग्नालाही त्यांचे गावी पवन घोडयाला नेले होते. एवढे प्रेम पवन घोडयाने चिंचखेडे व कोठली येथील परीवाराला दिले आहे. शाळांमध्ये वा लग्नांना या पवन घोडयाला बहुतांशवेळी विनामुल्य घेउन जायचे. कुणी कधी थोडेफार आर्थीक मदत केली तीच आपण घेतली. असे घोडामालक विनोद पाटील कोठली यांनी दै. लोकमतशी बोलतांना सांगीतले. भडगाव तालुक्यासह कोठली गावात व परीसरात पवन घोडा हा सार्यांचा लाडका बनला होता. कोठली रस्त्यालगतच्या खळयात गुरा ढोरांसोबत या पवन घोडयाला बांधलेले असायचे. जाता येता नागरीक, तरुण, महिला या पवन ला आरोळी मारत हिरवा चारा खाऊ घालायचे. आरोळी मारताच पवन घोडा मान हलवुन किंकाळी देत समोरच्याला साद दयायचा. 
क्रुर काळाने पवन घोडयावर घातली झडप. सारा परीसर हळहळला — पवन घोडयाला दोन दिवसापासुन आजाराने ग्रासलेले होते. विनोद पाटील यांनी खाजगी पशुवैदयकीय ५ ते ६ डाॅक्टरांचा सल्ला व औषधोपचार घेतले. दि. १८ रोजी सायंकाळी पवन घोडयाची अचानक जादा प्रक्रुती बिघडली. डाॅक्टरांचा औषधोपचार सुरु होता. प्रचंड व असहय वेदनांनी विव्हळत  अचानक राञी ८.३० वाजेच्या सुमारास पवन या घोडयाची प्राणज्योत मालवली. डाॅक्टरांना या पवनच्या औषधोपचार करतांना निदानच कळले नाही. लाडक्या पवन घोडयाने जमिनीवर मान टेकत जीव सोडला. यावेळी विनोद पाटील यांचेसह परीवारातील सदस्यांनी व नागरीक, महिलांना रडु कोसळले. आक्रोश झाला. आमचा लाडका पवन आम्हाला सोडुन गेला. असा आक्रोश उपस्थितांसह मालकाच्या परीवारात सुरु होता. यावेळी सारे गाव घटनास्थळी जमलेले होते. लाडका पवन गेल्याचे दुख सार्यांना होते. सार्यांच्या डोळयात अश्रुंच्या धारा वाहतांना दिसत होत्या. राञी खळयाजवळच असलेल्या जागेत या पवन घोडयाचे माणसाच्या अंत्ययाञेप्रमाणे पुजा, अर्चा, विधी करुन नागरीकांच्या शेकडोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी  अंत्यविधीला  ४०० च्या जवळपास नागरीक, तरुण, महिलांची उपस्थिती होती. पवन घोडा गावाची मोठी शान होती. अशा प्रतिक्रीया नागरीक, महिलांच्या कानी पडत होत्या. पवनने प्राण सोडले तेव्हा त्याचे टेंप्रेचर १०९ जवळपास होते. त्याचा मेंदुवरचा ताबा सुटला होता. पवन हा वेदनांनी विव्हळत जवळील दगड वा लाकडांना चावा घेत भयंकर स्थितीत दिसुन आला. पवन घोडयाने या दरम्यान पञ्याचे शेडही जमिनीवर पाडले. माञ औषधोपचार सुरु असतांना पवन घोडा शांत राहीला. अर्धा तासात शांत जमिनीवर मान टेकत प्राण सोडला. उपस्थित सारेच अवाक झाले. असा हा परीसरात लाडका  पवन नावाने परीचीत घोडा मालकासह नागरीकांच्या मनाला चटका देउन गेला. एखादया चिञपटात शोभावे असे मालक अन घोडयाचे जोपासलेले  प्रेम. नागरीकांनीही पवन च्या प्रेमाला दिलेले प्रेम अखेर हया आज आठवणी ठरतांना दिसत आहेत. ऐ मेरे दोस्त लोटके आजा.. अब तेरी बीन जिंदगी अधुरी है। हया हिंदी चिञपटाच्या गिताच्या ओळींची दुखमय भावनांनी आठवण होतांना दिसत आहे.
प्रतिक्रीया —
पवन घोडा हा आमच्या  परीवारातील सदस्यांसह नागरीकांमध्ये फारच लाडका होता. १४  वर्षापासुन पवनला सांभाळत लाडाने, प्रेमाने लहानाचा मोठा केला. पवनला दोन दिवसाच्या आजाराने कवटाळत पवनची प्राणज्योत मालवली आहे. आम्हा सार्यांना या दुखद घटनेची हळहळ सोसावी लागत आहे. पनच्या आठवणी कायम आमच्या ह्रदयात राहतील. 
विनोद बापुराव पाटील. घोडा मालक. रा. कोठली. ता. भडगाव. जि. जळगाव.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.