Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


हतनूरमधील जलसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणार . अभियंता चौधरी यांनी दिली माहीती


 
तापी व पूर्णा नदीवरील जळगांव जिल्हातील सर्वात महत्वाच्या हतनुर धरणातून औद्योगिक सिंचन आणि शहरी वापरासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या स्थिती सिंचनासाठी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे तर पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे .
धरणात 160 दलघमी जिवंत साठा आहे . शुक्रवारी धरणाच्या कॅचमेंट परिसरात 112.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . सध्याच्या साठा पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा आहे .
हतनुर धरणावर भुसावळ , यावल ,अमळनेर , चोपडा या नगरपालिका पाण्यासाठी अवलंबून आहेत .जळगाव एमआयडीसी ' ऑर्डनस फॅक्टरी , रेल्वे , दीपनगर वीज निर्मिती प्रकल्प यांनाही पाणीपुरवठा केला जातो .
उन्हाळा सुरू झालेला आहे एप्रिल आणि मे महिन्यात तापमान चाळीसच्या पार जात असते . त्यामुळे सिंचनासाठी धरणातून पाणी देणे बंद करण्यात येते . केवळ पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा सुरू ठेवला जातो . सध्या धरणाचे 160 दलघमी जिवंत पाण्याचा साठा आहे 62.74% पाणीसाठा धरणात आहे .
धरणाच्या कॅच में भागात 112.4 मिलिमीटर पाऊस झालेला आहे . परंतु पावसाळा सुरू व्हायला दोन ते अडीच महिने बाकी आहे
हतनुर धरणातील जलसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत औद्योगिक व पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा आहे . सध्याला ढगाळ वातावरण असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होत आहे . अशी माहिती हतनूर धरणअभियंता जीएस चौधरी यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.