भुसावळ येथे दोन दिवसापूर्वी पोलीसांनी गुटखा जप्त केला होता . शहरात अंमली पदार्थ शोध मोहीम सुरू असुन ९ एप्रिल रात्री रोजी जामनेर रोड वरील श्रद्धा नगर येथील उषा रेसिडेन्सी मधून ३९ हजार ४२० रुपयाची एम.डी पावडर जप्त करण्यास बाजार पेठ पोलीसांना यश आले आहे .
या प्रकरणी पोलिसांनी सत्वंत सिंह ,वय ३९ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पोलीस गेल्या पाच ते सहा महिन्यापासून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा शोधात होते . अखेर तारीख ९एप्रिल रोजी जामनेर रोडवरील श्रद्धा नगर येथील रूम नंबर सहा उषा रेसिडेन्सी मधील रहिवासी सत्वंत जसवंत सिह वय ३९ याने त्याचे कब्जात १३ग्रॅम १४० मिलीग्राम वजनाच्या एम डी पावडर ड्रग एकूण ३९ हजार ४२० रुपयांचा पदार्थ मानवी जीवनावर परिणाम करणारा विक्री करीत साठवून स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला आहे .
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असतात १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . भुसावळ शहरात याआधी पंचशील नगर मध्ये . कारवाई . करण्यात आली होती .
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एम
. डी पावडर विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे . यातील मुख्य सुत्रधार भुसावळातील असून दहा हजार रुपये महिन्याच्या पोटी आठ ते दहा तरुणांना कामाला लावून फोनवरून संबंधितांना घरपोच करीत आहे.
एम .डी पावडर ही सिथेटिक औषधी आहे याचे सेवन केल्याने मानवाची उत्तेजनचा एनर्जी प्लेजर शक्ती निर्माण होते असे सांगितले जाते .