Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व कायम . १८ पैकी १७ जागावर महाविकास आघाडी विजयी


संपूर्ण जळगांव जिल्ह्याचे लक्ष असलेले बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये अठरा पैकी १७ जागा मिळवून महाविकास आघाडीच्या पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवले असून या निवडणुकीत मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का दिल्याचे वृत्त आहे .
कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे पूर्ण . ताकदीनिशी उतरले होते तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा संपूर्ण पातळीवरून ताकद लावल्यावर सुद्धा त्यांना केवळ एक जागेवर सामाधान मानावे लागले हा मोठा धक्का मानला जात आहे . कृषी उत्पन्न बाजार समितीला वरणगाव जोडले असल्याने वरणगाव परिसरात तसेच बोदवड वरणगांव  परिसरात नाथाभाऊंचे अजूनही वर्चस्व कायम असल्याचे यावरून समजते .
 भुसावळ मध्ये बाजार समितीत भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले तरी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ एक जागा भाजपाला मिळाल्या यांचे आत्मचिंतन करावे लागेल असे चित्र समोर आले आहे .
यापूर्वीच आमदार एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट केले होते की सदरची निवडणूक ही विधानसभेच्या निवडणुकीच्या बरोबरीचे असते हे यापुर्वी आ खडसे यांनी . सांगितले होते आणि या निवडणूकीत मध्ये शेतकऱ्यांचे मतदान व सामान्य लोकांचे मतदान अधिक असते यावरूनच विधानसभेचा कौल समजला जातो .यावरून सिद्ध होते की चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलला मतदारांनी नाकारले आहे असे मानले जाते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.