७ मार्च शुक्रवार रोजी भुसावळ येथील भाविक माता नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ३९९० किलो मीटर च्या प्रवासासाठी माता नर्मदाचा जयघोष करीत रवाना झाले आहेत .
प्रथम ओंकारेश्वर येथे संकल्प करुन खरगोन खळघट , शहादा प्रकाशा , अंकलेश्र्वर , कटपुर , रेवा ,सागर ,करुन उत्तर तट सुवा कुबेर , गरुडेश्वर , पावागड , महेश्वर , जबलपूर हून अमर कंटक उगम हून होशंगाबाद मार्गे ओंकारेश्वर परिक्रमा पूर्ण होते .
महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तीन राज्यातून परिक्रमा पूर्ण होते . ही अठरा दिवसाची परिक्रमा आहे .
नर्मदा बचाव आंदोलनाचे ज्येष्ठ नेते श्री चंद्रकांत चौधरी भुसावळ यांनी श्रीफळ वाढवून पूजन करून परिक्रमा करणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत . परिक्रमेचे आयोजक दिनेश श्री कृष्ण सोनार असुन परिक्रमा साठी काही प्रमुख भाविकांना मध्ये मधुकर रोटे बाबा ,प्रकाश जयस्वाल ,वासुदेव कोल्हे ,शामराव कोल्हे ,कुसुम कोल्हे , हेमा भंगाळे ,नेमीचंद धांडे ,जयश्री धांडे , रजनी धांडे , वंदना झांबरे ,मिनाबाई इंगळे , तुळसाबाई पाचपांडे , सरोजिनी देशमुख व पुष्पलता पाटील यांचा सामावेश आहे .
व इतर महिला पुरुष भाविक
माँ नर्मदा यांचा जय घोष करीत परिक्रमा साठी रवाना
माँ नर्मदा परिक्रमा