ग्रीन हायड्रोजन वापरल्याने वीज व विजेसाठी लागणारा कोळसाही वाचेल, कार्बन उत्सर्जन घटेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील सातही केंद्रांत तो राबवला जाईल. विद्युत केंद्रांत जनरेटर कुलिंगसाठी हायड्रोनचा वापर होतो. उत्पादन वाढले तर त्याचा इंधन स्वरुपात होऊ शकेल. २०३० पर्यंत ५ दशलक्ष मेट्रिक टन हायड्रोजन इंधनाचे उत्पादन करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. यामुळे ग्रीन एनर्जीवर २०३० पर्यंत कारही धावतील.
राज्यात ७ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामध्ये निर्मितीला शासनाने मंजुरी देत १५.७ कोटींची तरतूद जनरेटर कुलिंगसाठी रोज ६७० क्युबिक वायूच्या निर्मितीसाठी याच केंद्रांमध्ये तयार होणारी २८०० किलोवॅट वीज वापरली जाते. यापुढे या कामासाठी सौर उर्जा वापरली जाणार असल्याने या विजेच्या निर्मितीसाठी लागणारा ६० टन कोळसा वाचणार आहे.