Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथील प्रणिता प्रतिष्ठान तर्फे हनुमान जन्मोत्सवा निमित्त सामुहिक हनुमान चालीसा पठन कार्यक्रम संपन्न


    

               भुसावळ येथील प्रणिता प्रतिष्ठान तर्फे हनुमान  जन्मोत्सव कार्यक्रमात हनुमान चालीसाचे अकरा आवर्तन सामुहिक पठण व अनुष्ठान कार्यक्रम शारदा नगर येथील के . नारखेडे शाळेजवळ उत्साहात संपन्न झाला .
कार्यक्रमात दिप प्रज्वलन व हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रास्ताविकात विवेक कुलकर्णी यांनी कार्यक्रमाविषयी माहीती सांगितली . सामुदायिक हनुमान चालीसा पठणात विवेक कुलकर्णी व मंगेश जोशी आदींनी सातशे ते . आठशे पुरुष व महीला भाविकांनी  संगीत वृंदासह सहभाग घेतला . 
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठानचे उपक्रमाविषयी माहीती सांगितली . यावेळी अंश सोनवणे या बालकाने हनुमानाची वेषभुषा केली होती .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे खजिनदार . भानुदास पाटील यांनी केले तर आभार सुनिल इंगळे यांनी मानले . 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी  अध्यक्ष - मिलिंद धर्माधिकारी  सचिव - अविनाश पाठक खजिनदार - भानुदास पाटील ,सदस्य - विवेक कुलकर्णी ,प्रवीण पाटील ,सुनील इंगळे ,विकास भराडे ,गणेश नागणे 
,गिरीश भारंबे ,डॉ. प्रशांत जयस्वार ,प्रकाश धर्माधिकारी  आदींनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.