भुसावळ शहरातील समता नगर भागात राहणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हंसराज खरात , आतिष खरात यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता .
संशयित आरोपी हंसराज खरात गुन्हा घडल्यापासून फरार होता 16 एप्रिल रोजी बाजारपेठ ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे .
रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे गार्डन जवळ रोडवर भुसावळ येथील गुडेगिरी करणारे गुन्हेगार असून दरोडेखोरांच्या टोळी पैकी असून 23 फेब्रुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास मोटरसायकलीने रेल्वे स्टेशन गार्डन येथून फिर्यादी राहत्या घरी जात असताना आरोपींनी त्याची मोटरसायकल आडवी लावून फिर्यादीचा रस्ता आणून डोक्यात फायटरने हत्याराने दुखापत केली होती . तसेच फिर्यादीच्या डोक्याला बंदूक लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे इसार खान अनादर खान राहणार बिलाल मशीन जवळ ग्रीन पार्क भुसावळ यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता .
गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी हंसराज रवींद्र खरात हा फरार होता बाजारपेठ ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आरोपी समता नगर आरपीडी रोड येथून ताब्यात घेऊन अटक केली सदर कारवाई पोलीस कॉन्स्टेबल निलेश चौधरी उमाकांत पाटील प्रशांत परदेशी प्रशांत सोनार जावेद शहा सचिन चौधरी जीवन कापणे महेंद्रसिंग यांनी अटक केली आहे .
आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
पुढील तपास स पो नि मंगेश गोटला करीत आहेत .