सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
१) Bjp अमोल शिंदे गट शेतकरी सहकार पॅनल कालपर्यंत बहुमताकडे वाटचाल करीत होते, आज घडलेल्या घटनांनी त्रिशंकूत अडकले पण तरी ६ ते ७ जागांच्या अवतीभवती राहण्याची शक्यता वाटत होती
तंबुतील गर्दी अचानक अनपेक्षित घटली, आधीपासूनच सुसूत्रता मतदारांच्या गाठीभेटीमुळे निर्माण झालेला होता गोडवा मात्र आज अचानक थोडा घटलेला आले निदर्शनास, आल्याचे जानकार सांगतात
विरोधकांना आरोपांमध्ये घेरत चांगलीच कोंडी निर्माण करण्यात मिळाले यश,
निवडणूक दरम्यान रणनीती आखण्यात ठरले मातब्बर, वजीर केव्हा राजाला चित करेल याकडे ताकदीने करताय वाटचाल,
२) शिवसेना भाजप युती शेतकरी विकास पॅनल आमदार आप्पासाहेब गट कालपर्यंत त्रिशंकूत अडकेले होते पण आज अचानक झालेल्या घडामोडीत बहुमातकडे वाटचाल करतील अशी शक्यता, ६ ते ८ जागेंच्या अवतीभवती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही .
रात्रीचे केशर दूध तर सकाळचा पोहे, शिरा तंबूत अचानक तुडुंब गर्दी वाढवत मतदारांमध्ये गोडवा निर्माण करत होता,
कुणाच्या आरोप प्रत्यारोपांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात वेळ वाया घालण्यापेक्षा आपल्या शैलीतील दमदार भाषणातून मतदारांच्या मनावर केले अधीराज्य, हुकुमचा एक्का म्हणून पुन्हा आले जनतेसमोर,
३) महाविकास आघाडी राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा, काँग्रेस, वज्रमूठ पॅनल कालही शांततेत तर आजही शांतेत तर कुठे ग्रँड एंट्रीने घडलेल्या घडामोडीत कालही त्रिशंकूत अडकलेले होते तर आजही त्रिशंकूतच असल्याचे चित्र, ४ ते ५ जागांच्या अवतीभोवती असण्याची शक्यता,
तीन पक्षीय एकत्रीत मुळे एकत्रित येऊन लढण्यासंबंधी नियोजनाचा अभाव असल्याचे आले निदर्शनास,,,
दोघेही राष्ट्रवादी, काँगेस चे भाऊ मतदान केंद्रावर तळ ठोकून तर ताईं मतदारांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना आले निदर्शनास,
दिलीप भाऊंनी बिनबुडाचे आरोप न करता राखली मतदारांची मर्जी, शांत, सुशक्षित, स्वभावाचे घडले दर्शन,,
हसत खेळत राजकारण करण्यात पाचोरा तालुक्यात प्रथम क्रमांकाचे नेते,
पाचोरा राजकारणात ताई विरोधकांपुढे भविष्यात उभे करतील आव्हान, पण अचानक निवडणुकीच्याच तोंडावर ग्रॅण्ड एंट्री करण्यापेक्षा नेहमीच मतदारांशी नाड जोडल्यास नक्कीच फायदेशीर ठरेलच, असेल दम भरून ठेवल्यास एका पंचवार्षिक नंतर उज्वल भविष्याकडे वाटचाल नक्कीच,,
या तिरंगी लढतीत तिघेही पॅनल मातब्बर व लोकप्रिय असल्याने उमेदवारांच्या प्रेमापोटी मतदारांनी तिघही पॅनलला पसंती देऊन उमेदवारांना क्रॉस वोटिंग करण्याच्या भानगडीत पडल्याने शेवटी विजय कोणाचा आहे सांगणे आजही कठीणच, कोणते फेरबदल मतदार राजांनी केलेले आहेत ते आपण सांगणे कठीण असल्याने हा फक्त अंदाजच आहे, खरे चीत्र ३० एप्रिल रोजी आपल्यास पहावयास मिळेल