Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कथित खंडणी प्रकरणात भुसावळचे माजी आ. संतोष चौधरी निर्दोष ' राजकारणात पुन्हा वर्चस्व वाढण्याचे संकेत




भुसावळचे माजी आमदार व माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्यावर जळगाव येथील बांधकाम व्यवसायिक चंद्रशेखर अत्तरदे यांनी खंडणी मागितल्याच्या प्रकरणांत गुन्हा दाखल केला होता . ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली होती . या प्रकरणात संतोष चौधरी यांना जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे . सदर प्रकरणात संतोष चौधरी यांना कारागृहात सुद्धा राहावे लागले होते . आणि तेव्हापासून त्यांचा राजकीय सहभाग सुद्धा कमी झालेला होता . खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर केलेला असल्याने न्यायालयाने त्यांना दोन वर्ष ' एक महिना , व १८ .दिवस शिक्षा ठोठावली होती . त्यांनी या शिक्षे  विरोधात. अपिल केले होते . न्यायालयात सागर चित्रे यांनी संतोष चौधरी यांची बाजू भक्कम पणे मांडल्याने संतोष चौधरी यांना निर्दोष मुक्त केले आहे . त्यामुळे आता संतोष चौधरी यांचा पुढील राजकीय वाटचालीसाठी मार्ग खुला झाला आहे .नुकतेच  राष्ट्रवादीचे दोन्ही नेते संतोष चौधरी व एकनाथराव खडसे यांचे मनोमिलन विल्हाळे येथे झाले असून त्यानंतर चार-पाच दिवसातच या पद्धतीचा  सकारात्मक निकाल येणे म्हणजे संतोष भाऊ चौधरी यांचे राजकारणामध्ये पुन्हा वर्चस्व प्रस्थापित होणार असे राजकिय पटलात बोलले जात आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.