दोन आमदार असलेल्या व ५१ खेड्यांचा कारभार अवलंबुन असणार्या बोदवड तालुक्याला दीड वर्षापासून कायम तहसीलदार नसल्याची तक्रार प्रमोद धामोडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे .
तहसीलदार नसल्याने ऑफिस मध्ये शेतकऱ्यांचे अनेक कामे खोळंबले असून पुरवठा विभागात सुद्धा अनियमित्ता आली आहे .
अनेकांना रेशन कार्ड अभावी शिधा मिळणे कठीण झाले असून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर सुद्धा कोणताही अंकुश राहिलेला नाही . सर्व कारभार रामभरोसे सुरु आहे .
मध्यंतरीच्या काळात मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदर प्रश्न विधानसभेत उचलला असता तात्पुरत्या स्वरूपात पंधरा दिवसांसाठी तहसीलदार देण्यात आला होता . परंतु सध्या सुद्धा या ठिकाणी तहसीलदार नसल्याने सर्व कामे थंड बसत्यात पडल्याचे वृत्त आहे . या युवकाने उपोषण सुद्धा यासाठी केले होते यावेळी विधान परिषद गटनेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आश्वासन देऊन उपोषण सोडवले होते .तरी पण तहसीलदार मात्र बोदवडला मिळालेला नाही .