फुलगाव ग्रामपंचायतीच्या गैर कारभारा बाबत मुख्याधिकारी जिल्हा परिषद जळगाव व पंचायत समितीकडे सुद्धा योग्य दखल न घेतल्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम फुलगावकर हा युवक ग्रामपंचायतच्या समोर उपोषणास बसला आहे .
वित्त आयोगाच्या कामांमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला असून सदर भ्रष्टाचार सामूहिक स्वरूपाचा आहे . यामध्ये सर्व पदाधिकारी व अधिकारी व बाहेरील व्यक्ती सुद्धा समाविष्ट असल्याचे उपोषण कर्त्या ने सांगितले आहे .
कोरम प्रभावी सभा तहकूब करून खोटे ठराव करणे . ग्रामपंचायत सदस्य यांना सुद्धा माहिती न देणे , ग्रामपंचायत सदस्यांना माहिती हवी असल्यास माहिती आधिकारात माहिती मागावी असा नियमबाह्य ठराव करून दिशाभूल करणे , ग्रामनिधी वित्त आयोगाच्या कामांमध्ये खोटे बिल , काढणे ग्रामीण आरोग्य शिबिर व जनजागृती कार्यक्रम दाखवून दिलं पास करणे , मासिक मीटिंगमध्ये खोटे ठराव करून औद्योगिक प्रकल्प दिपनगर कडून मिळणाऱ्या सीएसआर फंडामधील निधीचा गैरवापर करणे . हे मुद्दे महत्त्वाचे सांगुन त्यांनी उपोषणाचे परवानगी मागितली असता ते नाकारण्यात आली आहे ' सदरचा चौकशीसाठी अधिकारी नेमलेला होता तो बदलून मिळण्याची मागणी सुद्धा श्याम फुलगावकर यांनी केली होती यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी सदर अधिकारी बदलला असल्याने परवानगी नाकारण्याचे सांगितले . परंतु या उपोषणामुळे फुलगाव मध्ये खळबळ माजली आहे .