गुरुवारी दुपारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास साकेगाव येथे वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली .
अनेक झाडे कोलमडली तर जिल्हा परिषद शाळेचे खूप मोठे नुकसान झाले आहे . शाळेवरील संपूर्ण पत्रे उडून गेले असून अनेक ठिकाणी बांधकामही पडल्याचे वृत्त आहे . या ठिकाणी विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे . अनेक झाडे पडले आहे . तर अनेकांचे घरा वरील पत्रे उडाले तसेच व्यवसायिक दुकानदाराच्या आपल यामध्ये टपर्याच उडून गेल्या आहे . सदर घटनास्थळी गटविकास अधिकारी तसेच केंद्रप्रमुख येथील चौधरी यांनी भेट दिली असून नुकसानीचा पंचनामा करावा अशी अपेक्षा गावकऱ्यांनी मागणी केली आहे .