जळगाव जवळ कुसुंबा गाव नजीक वादळी वार्याने कंटेनर उलटून दोन जण ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यात तीन दिवसा पासुन वादळी वारे व गारपीट सुरू असून गुरुवारी दुपारी वादळ सुटले यावेळेस भोला श्री कुसुम पटेल राहणार बिहार व चंद्रकांत वाभळे वय 52. रा . चाळीसगांव ह मु .. मुक्काम पुणे हे नवीन शासकीय विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असताना सदर काम हे न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले असून या रुग्णालयासाठीचे साहित्य घेऊन कंटेनर ने जात होते . पण वादळाला सुरुवात झाल्यामुळे कंटेनर बाजूला थांबवुन उभे होते . यावेळी या दोघांनी शेड चा आधार घेतला असता पत्री शेड वादळामुळे उडून गेल्याने पुन्हा आहे दोघं कंटेनर जवळ येऊन उभे राहिले परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कंटेनरच त्यांच्या अंगावर पडल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे . तर अभ्रोच आलम वय 23 रा . कुडाळे बिहार हा जखमी झाला आहे . त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहे .
सदर कंटेनर क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात येऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर भोला हा गरीब कुटुंबातील होता आणि कंत्राटी पद्धतीने काम करत होता तर वाभळे इंजिनिअर म्हणून त्या कंपनीत कामाला होते .