वरणगांव ता भुसावळ येथे बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर कुस्त्यांची आमदंगल उत्साहात पार पडली, त्यात प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी यांची त्यांचे वडील रामदास बागळी यांची विशेष उपस्थीती होती .
वरणगाव येथे हनुमान जन्मोत्त्सवानिमित्त हनुमान व्यायाम शाळेच्या संचालक मंडळा तर्फे ता.१० एप्रील सोमवार रोजी महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात कुस्त्यांची भव्य आमदंगल भरविण्यात आली होती .
प्रसंगी प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. येथील कुस्त्याच्या सामन्यांत राज्याच्या विविध भागातून तसेच हरियाणा राज्यांमधुन लहान मोठया शेकडो मल्लांनी सहभाग नोंदवला होता.हे सामने पाहण्यासाठी गावकऱ्यांनी हजारोच्या संखेने गर्दी केली होती.
मातीमधील महिलां खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांच्या माध्यमातुन प्रथम महीला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागळी यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या प्रसंगी चंद्रकांत बढे सर, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, धनंजय शिरिष चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र,सोनवणे सुधाकर,जावळे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भोळे , जिल्हा प्रमुख उबाठा सेना समाधान महाजन, गणेश झोपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ, परशुराम दळवी, प्रशांत ठाकूर , नागेन्द्र तायडे ) जिल्हा कुस्तीगीर संघाचे सुनील देशमुख, मुख्याधिकारी समीर शेख, यांचे सह विश्वस्त मंडळाचे नामदेव पैलवान एकनाथ पैलवान, सुपडू पैलवान, संजय बावस्कर, दिनेश देशमुख, बाळासाहेब चव्हाण, संजय चौधरी ,विनोद झोपे ,चुडामन वाघ ,शंकर पटेल ,रामदास पैलवान, महेश सोनवणे, प्रशांत निकम ,जाफर अली ,भैय्या सोनवणे, श्रीराम भोई, नरेंद्र भोई ,शिवा भोई,मनोज भोई, गणेश भोई, इफ्तेखार मिर्जा ,अतुल पाटील, इत्यादीची उपस्थित होती.
सदर स्पर्धेमध्ये बाळू पैलवान सांगली, लोकेश पैलवान सांगली, यांनी ढाक व नागपट्टा डावावर हरियाणा केसरी दिपक पैलवान व राजित पैलवान यांना आसमान दाखविले ' तर हनुमान व्यायाम शाळेचे मल्ल मुतलिक पैलवान,अरबाज पैलवान, अक्षय माळी , संकेत माळी, किरण माळी, गौरव माळी, गणेश माळी,प्रणय बावस्कर, सुरेंद्र बावस्कर, अजय तायडे, तसेच प्रेम पैलवान रावेर ,शुभम भोई ,पैलवान भुसावळ ,आदित्य पैलवान जालना, गणेश पैलवान रावेर या मल्लांनी कुस्त्या जिंकल्या ' या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. कुस्ती आमदंगल मध्ये प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी यांची त्यांचे वडील पैलवान रामदास बागडी यांचे उपस्थितीने विशेष उत्साह संचारला होता .कुस्ती ठिकाणी प्रमुख आकर्षण प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी यांची त्यांचे वडील पैलवान रामदास बागडी यांचे सह उपस्थिती होती .
तसेच वरणगावातील महिलां मधे हेमलता सोनवणे , निर्मला निकम , बसंता बाई मोरे , कीर्ती चव्हाण , संध्या बावस्कर , योगिता सोनार , प्रियंका मोरे , रेश्मा हजबन , वसुधा चौधरी यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती .
यावेळी उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेले आशिष चौधरी , सतीश मोरे , गणेश बोदडे , दिलीप संगेले , सुनील वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला . पंच म्हणून दिलीप पैलवान ' इस्माइल पैलवान ' संजय पैलवान ' एकनाथ पैलवान ' नामदेव पैलवान ' आशिष अडसुळ , यांनी काम पाहिले . सुत्रसंचालन बाळासाहेब चव्हाण यांनी केले .